घरासमोर पार्क केलेली रिक्षा चोरीला

PCB Admin
1 Min Read

पिंपळे गुरव, दि. १९ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली रिक्षा चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १८) मध्यरात्री एक ते सकाळी साडेसात वाजताच्या कालावधीत मातोश्री पार्क, मोरया पार्क पिंपळे गुरव येथे घडली.

विजय बालाजी चव्हाण (वय ३२, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १२/क्यूई ४३४०) त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी रिकसह चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article