आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर सर्व स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण .

PCB Admin
2 Min Read

पिंपरी , दि. ३ (पीसीबी)- पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आलीये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर सर्व स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात येतीये .

राजकारणातील अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती .पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आलीये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर सर्व स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात येतीये . राजकारणातील अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती .सुप्रिया ताई सुळे अजित पवार , रोहित पवार , अमोल कोल्हे , उदयन राजे भोसले , जितेंद्र आव्हाड , रुपाली ताई चाकणकर ,धनंजय मुंडे आणि अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनीही त्यांना सोशल मीडिया च्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केलीये

Share This Article