गुरुवारी शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. २८ (पीसीबी)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्ती कामकाज केले जाणार आहे. स्थापत्य देखभाल व दुरुस्ती विभागामार्फत गुरुवारी (दि.29) रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी फुगेवाडी, निगडी, सी.एम.ई., आर ॲण्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल., कँटोन्मेंट बोर्ड, ओ.एफ.डी.आर. या भागातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याचा साठा अगोदर करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

Share This Article