ओव्हरटेक करणाऱ्या कारमुळे दुचाकीचा अपघात

1 Min Read

सांगवी, दि. १० (पीसीबी) – भरधाव वेगातील कार ओव्हरटेक करून जात असताना दुचाकीला धक्का लागला. त्यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी काटे पुरम चौक, पिंपळे गुरव येथे घडली.

जसवंतसिंग हरजिंदरसिंग माजू (वय 36, रा. नवी सांगवी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी माजू यांच्या बहिणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला धक्का दिला. त्यात माजू हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article