इंद्रायणीनगर मधून कार चोरीला

1 Min Read

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – रात्रीच्या वेळी सोसायटी समोरील रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी इंद्रायणी नगर, भोसरी येथे उघडकीस आली.

राहुल बाळासाहेब लोखंडे (वय 37, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची कार शुक्रवारी (दि. 30) रात्री दहा वाजता सोसायटी समोरील रस्त्याच्या बाजूला पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कार चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article