घरफोडी करून दागिने पळवले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. ३ (पीसीबी) – घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरातून 70 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी साडे अकरा ते दुपारी पावणे एक वाजताच्या कालावधीत शिवराज नगर, रहाटणी येथे घडली.

अशोककुमार राजेंद्र प्रजापती (वय 34, रा. शिवराज नगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणे एक वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून 70 हजार रुपये किमतीचे 28 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article