बांधकाम कामगाराला मारहाण करून लुटले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी दि.१ (पीसीबी) -बांधकाम कामगाराला मारहाण करून त्याचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम काढून चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री आळंदी येथे घडली.

राजकुमार बळीराम कवडे (वय 24, रा. चोविसासाठी), नरहरी सोपान तांदळे (वय 29, रा. देहूफाटा), ऋषीकेश विजय गोळे (वय 34, रा. आळंदी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किस्मत अली अन्सारी (वय 32, रा. डुडुळगाव) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम मिस्त्री आहेत. ते केळगाव बायपास येथून जात असताना रिक्षातून आलेल्या तीन आरोपींनी अन्सारी यांना लाथाबुक्क्याने डोक्यात, तोंडावर, नाकावर, पोटात मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. अन्सारी यांच्या खिशातून मोबाईल फोन रोख रक्कम असा 16 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article