खंडणी न दिल्याने हॉटेल चालकावर तलवारीने वार

0
525

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – हॉटेल चालकाकडे मागितलेली खंडणी न दिल्याने दोघांनी हॉटेल चालकावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. तसेच हॉटेल मधील सामानाची तोडफोड केली. आजूबाजूच्या दुकानदारांना तलवारीच्या धाकाने दुकाने बंद करण्यास भाग पाडत दहशत पसरवली. ही घटना मंगळवारी (दि. 2) दुपारी चेतना बार अँड रेस्टॉरंट चिंचवड येथे घडली.

राजेंद्र जयकर शेट्टी (वय 28, रा. भीमनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार उर्फ हेमंत ओव्हाळ, अक्षय जगताप (दोघे रा. भीमनगर चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेट्टी हे त्यांच्या चेतना रेस्टॉरंट अँड बार मध्ये असताना आरोपी तिथे आले. आरोपींनी शेट्टी यांच्याकडे मंगळवारी सकाळी दहा हजार रुपये खंडणी मागितली होती. ती खंडणी न दिल्याने आरोपींनी तलवारीने वार करून शेट्टींना गंभीर जखमी केले. शिवीगाळ आणि धमकी देत हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली. शेट्टी यांच्या हॉटेल शेजारी असलेल्या श्री ग्राफिक्स फ्लेक्स प्रिंटिंग आणि कृष्णा सुपर मार्केट शिवीगाळ, तलवारीच्या धाकाने दमदाटी करून हप्ता मागत दुकाने बंद करण्यास सांगितले. हातातील तलवारी हवेत फिरवत दहशत निर्माण करून आरोपी निघून गेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.