मेहुणी, सासूला मारहाण करत विनयभंग

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) – मेहुणी आणि सासूला मारहाण करत एकाने सासूचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सिद्धार्थनगर, दापोडी येथे घडली.

याप्रकरणी पीडित मेहुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 40 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती आहे. रविवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. माझी पत्नी तुमच्या घरी आली आहे का, अशी आरोपीने विचारणा केली. त्यावर फिर्यादी यांनी नाही असे सांगून, काय झाले आहे, असे विचारले. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची आई आली असता त्यांनाही मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन करत आरोपीने त्यांचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article