चिंचवड, दि.१० (पीसीबी) – वेश्या व्यवसाय प्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ७) सायंकाळी दळवीनगर कडून चिंचवड रेल्वे स्थानकाकडे जाणा-या रोडवर चिंचवड येथे करण्यात आली.दिनेश वासूमल करमचंदानी (वय 28, रा. विजयनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रॉकी नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यावर आपली उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी कारवाई करून दिनेश याला अटक केली. दोन महिलांची सुटका केली. आरोपीकडून तीन हजार 540 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.