शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेला जिल्हाधिकाऱ्याचा दणका

0
1084

यवतमाळ, दि. १४ (पीसीबी) – शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेला यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी चांगलाच दणका दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एसबीआयमधील सहा महत्वाची खाती बंद करुन, बँकेसोबतचे आर्थिक व्यवहार तोडण्याची भूमिका घेतली आहे.

नियोजन, सामान्य निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन, खनिकर्म, पुनर्वसन, अधीक्षक जिल्हा कार्यालय अशा सहा विभागातील शासकीय खाते सेंट्रल बँकेसह युनियन बँकेत काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात एसबीआयच्या शाखांना खरिपात ५७१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र त्यापैकी केवळ ५१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याने देशमुख यांनी बँकेसोबतचे आर्थिक व्यवहार तोडण्याची भूमीका घेतली. तसेच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या  स्टेट बँकेला चांगलाच  दणका दिला आहे.