सातारा, दि. ११ (पीसीबी) – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जीविताला धोका असल्याची पोलिसांकडे तक्रार आल्यास निश्चित कारवाई करू, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे स्पष्ट केले.
काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी माझ्या जीविताला धोका असल्याने मला दिल्लीला जावे लागेल, असे फलटणमधील एका कार्यक्रमात म्हटले होते. याबाबत नांगरे- पाटील यांनी विचारले असता ते म्हणाले की, हे सर्व आम्ही वृत्तपत्रातूनच वाचले आहे. याप्रकरणी तक्रार आल्यास आम्ही निश्चित कारवाई करू, असे नांगरे-पाटील म्हणाले.
गणेशोत्सवादरम्यान, डॉल्वी लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या वाहनांसह डॉल्वी जप्त करण्यात येणार आहे. मंडळांनी नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे नांगरे-पाटील म्हणाले.