37 हजारात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणार होती; पोलीस बनले बनावट ग्राहक आणि मग….

0
297

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – रेमडेसिवीर इंजेक्शनचे तब्बल 37 हजार रुपयात विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणीसह चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तिच्या ताब्यातून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. खडकीतील गुरुद्वारा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. निकिता गोपाळ ताले (वय 25, महात्मा फुले नगर, भोसरी), राहुल बाळासाहेब वाळुंज (वय 22, अमित अपार्टमेंट, चापेकर चौक, चिंचवड), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय 20) आणि प्रतीक गजानन भोर (वय 26, तूपुर कॉम्प्लेक्स उत्सव हॉटेल समोर मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी जयश्री सवदती यांनी तक्रार दिली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तब्बल 37 हजार रुपये किमतीला एक इंजेक्शन विकण्याच्या तयारीत असणाऱ्या निकिता ताले हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्याकडे केलेल्या चौकशीत इतरही आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली आहे.