राष्ट्रीय खेळाडू, नामवंत वस्ताद राजाराम बारणे कालवश

PCB Admin
1 Min Read

वाकड : थेरगाव येथील नामवंत वस्ताद तसेच राष्ट्रीय खेळाडू पै. राजाराम धाकुजी बारणे (वय. ९४) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
ते जुन्या काळात जिल्ह्यातील आघाडीचे वस्ताद होते. खडकी येथील ऍम्युमिनेशन फॅक्टरीत ते नोकरीस होते. कुस्ती, रस्सी खेच व पोहणे यांसारख्या राष्ट्रीय स्पर्धात फॅक्टरीकडून देशभरात खेळताना त्यांनी शेकडो पदके मिळवुन दिली आहेत. शहरातील असंख्य नामवंत पैलवान त्यांनी घडविले आहेत. त्यांच्या पश्चात मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. थेरगावचे प्रथम सरपंच बाळासाहेब बारणे यांचे ते मोठे बंधू तथा माजी उपमहापौर झमाताई बारणे यांचे दीर तथा माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांचे चुलते निलेश बारणे व युवा उद्योजक प्रताप बारणे यांचे ते आजोबा होत.

Share This Article