खालील वृत्तांत आपल्या लोकप्रिय दैनिक संध्यानंद मध्ये प्रकाशित करावे ही विनंती.

bpcauthor
2 Min Read

दिल्ली येथील हॉटेल द तिओली, छत्तरपूर येथे १८-१९ ऑगस्ट 2026 रोजी पार पडलेल्या इंडियन फ्लोरिस्ट असोसिएशनच्या (IFA) ८ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात विक्रमी गर्दी झाली. देशातील २४ राज्यांतील 105 हून अधिक शहरांमधून २६३ फूल व्यावसायिक सहभागी झाले होते. एकट्या महाराष्ट्रातून ९५ सदस्यांपैकी ४५ जणांनी हजेरी लावली.

या विक्रमी अधिवेशनात पुणे, पिंपरी-चिंचवडच्या फूल व्यावसायिकांनी घवघवीत यश मिळवले.
पुण्याच्या प्रियांका सिंघल – Voice of IFA, Bloomera – बेस्ट new Floral business, Aura floral स्टुडिओ -best Showcase florist,
चिंचवडचे स्नेह फ्लोरिस्टचे पंढरीनाथ म्हस्के यांना ‘फ्लॉरिस्ट्री अॅम्बेसेडर’ तर पिंपरीचे ओम फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्सचे केशव त्रिभुवन यांना ‘रायझिंग स्टार ऑफ IFA’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच,अजय जगताप, अमर घोगरे, श्याम मांडगे, अविनाश लोखंडे, नारायण चौधरी,विजय आबनावे,प्रतीक वाघदरे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

अधिवेशनाची सुरुवात IFA अध्यक्ष आनंदकुमार यांच्या स्वागताने झाली. सर्व प्रतिनिधींचे वेलकम किट, पुष्पहार आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

IFA चे उपाध्यक्ष श्रीकांत कनोई यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, “उद्योग स्पर्धेमुळे थांबत नाहीत, तर सामान्य दर्जामुळे थांबतात. आपण फक्त आपला व्यवसाय नाही, तर संपूर्ण उद्योग घडवला पाहिजे.” IFA चे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ‘फ्लोराप्राईज’ (Floraprise) चे लाईव्ह प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले.

पुरस्कार वितरण: IFA उपाध्यक्ष श्रीकांत कनोई यांच्या हस्ते पंढरीनाथ म्हस्के यांना तर समिती सदस्य गोपाल सैनी यांच्या हस्ते केशव त्रिभुवन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोठी जबाबदारी: यावेळी पुण्यातील प्रियांका सिंघल यांची प्रवक्ता पदी, अजय जगताप यांची समन्वयक, पंढरीनाथ म्हस्के यांची IFA महाराष्ट्र प्रमुखपदी तर केशव त्रिभुवन यांची IFA प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

हा कार्यक्रम असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कुमार व संस्थापक संचालक रणजित मंडल व ईतर मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पहिल्याच IFA Yearbook 2026 चे प्रकाशन करून सभासदांना मोफत वाटप करण्यात आले. IFA महाराष्ट्र टीमच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कुमार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Share This Article