या सर्व परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी असून हे दुःख कधीही भरून न निघणारे आहे. पण निश्चितपणे आम्ही कायमस्वरूपी आपणाला सहकार्य तर करून परंतु राज्य सरकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून देखील आपल्या सर्व परिवारांना आमची मदत ही कायम राहील.
परंतु या ठिकाणी ही घटना अत्यंत गंभीर असून काही लोक वेगळ्या पद्धतीने सोयीस्करपणे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात.
समोरची परिस्थिती ओळखून लोकांनी या घटनेचे गांभीर्य समजून घेऊनच आपले विचार आपले आरोप आपली मागणी ही कायद्यानुसार मांडणं गरजेचं आहे
परंतु वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मांडून आम्ही सोशल मीडियावर कसे झळकेल आम्हाला लोक कसे मोठे म्हणतील यासाठी केविलवाणा प्रयत्न काही लोक करतात त्यामध्ये मानव कांबळे यांनी ज्या पद्धतीने घोषणा दिल्या त्यांचा मी जाहीर निषेध करतो.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार
महेशदादा लांडगे यांनी आजपर्यंत या शहरासाठी त्याचबरोबर शहराचे प्रलंबित प्रश्नांसाठी या शहराच्या विकासासाठी आणि या शहराच्या डेव्हलपमेंट साठी किती प्रयत्न केले आणि किती सत्यात उतरवले याचे साक्षीदार या शहराचे सुज्ञ लोक सर्व जाणून आहेत.
मोशी कचरा डेपो मध्ये झालेली दुर्घटना त्यामध्ये मृत पावलेले आमचे सर्व तरुण सहकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

