शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी शहरभर “घोंगडी बैठका” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

bpcauthor
1 Min Read

पिंपरी-चिंचवड : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासाठी, प्रत्येक शिवसैनिकाशी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी तसेच पक्षाची ताकद तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या “घोंगडी बैठका” उपक्रमास काल उत्साहात प्रारंभ झाला.

या उपक्रमांतर्गत काल शाहूनगर आणि दापोडी येथे दोन घोंगडी बैठका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या बैठकींना स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार तथा शिवसेना उपनेते मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आदेशानुसार, गटनेते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मा. श्री. विश्वजीत दादा बारणे तसेच शिवसेना उपनेत्या मा. सुलभाताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना महानगरप्रमुख मा. श्री. राजेश फलके यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

घोंगडी बैठकींच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या स्थानिक समस्या, युवा वर्गाच्या अपेक्षा, परिसरातील विविध प्रश्न तसेच संघटनात्मक सूचना जाणून घेत आहेत. या संवादातून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

या बैठकींमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे “घोंगडी बैठका” आयोजित करण्यात येणार असून अधिकाधिक शिवसैनिक व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Share This Article