शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात

1 Min Read

दि.२१(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल असल्यामुळे शरद पवार आज बारामती दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत.

दोन दिवसांपूर्वी आले आणि त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. सोमवारी डिस्चार्ज मिळणार होता. मात्र डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती मिळू शकेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांचे वय आणि अलीकडची प्रकृती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या सर्व रिपोर्ट्सची वाट पाहत आहेत, त्यानंतर पुढील उपचार किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल.

Share This Article