जपानमध्ये ७.४ रिस्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप,त्सुनामीचा

1 Min Read

सोमवारी जपानच्या ईशान्य किनाऱ्यालगत ७.५ तीव्रतेचा एक शक्तिशाली भूकंप झाला. यामुळे त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला असून, तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; कारण ३ मीटरपर्यंत (९.८४ फूट) उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सावध केले आहे, असे ‘रॉयटर्स’ने वृत्त दिले आहे. जपानच्या हवामान खात्यानुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात सुमारे १० किलोमीटरच्या उथळ खोलीवर होते. इवाते, आओमोरी आणि होक्काइदो या किनारपट्टीवरील प्रांतांमध्ये त्सुनामीचा सर्वाधिक तीव्र परिणाम होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share This Article