बास्केटबॉल कोर्टवर लोखंडी पोल अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

1 Min Read

दि.०६(पीसीबी) – तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात बास्केटबॉल पोल अंगावर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (५ एप्रिल) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. विशाल वर्मा (२०, तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विद्यार्थी वसतिगृह, इंदोरी, मावळ, पुणे. मूळ रा. आयोध्या, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण रस्त्यावर तोलानी इन्स्टिट्यूटच्या आवारात रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते. दरम्यान, विशाल हा बास्केटबॉल रिंगला लटकला असता जास्त वजन झाल्याने रिंग तुटली आणि त्यापाठोपाठ लोखंडी पोल देखील खाली पडला.

लोखंडी पोल अंगावर पडल्याने विशाल हा गंभीर जखमी झाला. तात्काळ उपचारासाठी त्याला तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article