राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे वीज कोसळून शेतकरी सोमनाथ गाडगे यांचा दुर्दैवी मृत्यू

1 Min Read

राहाता तालुक्यातील (Rahata) लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे सोमनाथ जिजाबापू गाडगे या शेतकर्‍याचा सोमवारी सायंकाळी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमनाथ हे 36 वर्षांचे तरुण शेतकरी (Youth Farmer Death) होते. मापरवाडी भागात त्यांची दोन ठिकाणी शेती आहे. घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीत त्यांनी कांदा लागवड केली. सोमवारी काही महिला मजुरांना कांदा (Onion) काढणीचे काम दिले होते. दिवसभर कांद्याची काढणी केल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. महिला मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागदाच्या आश्रयाला असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ यांच्यावर वीज कोसळली. मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ सोमनाथ यांच्या अंगावर कोसळले. जागेवरच त्यांचा मृत्यू (Death) झाला.

Share This Article