अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामा करण्याची सुनेत्रा पवार यांची सूचना

1 Min Read

दि.२०(पीसीबी)-पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Share This Article