सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण?आजचा सोन्याचा भाव किती?

2 Min Read

दि.१२(पीसीबी)-लग्नाचा हंगाम सुरू असताना मौल्यवान धातूंच्या किमतीत होणारी घसरण ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. जर तुम्ही सोन्या-चांदीचे वाढलेले भाव पाहून खरेदी लांबणीवर टाकली असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. गेले काही दिवस सातत्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. आज (12 मार्च 2026) भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी ही एक सुवर्णसंधीच मानली जात आहे.


चांदीच्या दरात तब्बल 1,300 रुपयांची मोठी घसरण झाली असून, नवा दर 2,67,200 रुपये प्रति किलोवर आला आहे.

सोन्याच्या दरातही 300 रुपयांहून अधिक घसरण झाली असून, ते 161, 490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

सलग दोन दिवसांपासून म्हणजेच बाजारात ही कमकुवत स्थिती कायम आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या काही तांत्रिक आणि आर्थिक बदलांमुळे भारतीय बाजारातही त्याचे पडसाद उमटत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. सामान्यतः जेव्हा डॉलरचे मूल्य वाढते, तेव्हा जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी होते आणि पर्यायाने त्याचे भाव खाली येतात. याव्यतिरिक्त, अमेरिकेतील महागाईच्या ताज्या आकडेवारीनंतर फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करण्याच्या निर्णयात विलंब करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उच्च व्याजदराच्या काळात सोन्यासारख्या मालमत्तेतील गुंतवणूक कमी फायदेशीर मानली जाते.

किंमती कमी होण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नफा वसुली हे आहे. गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. या वाढलेल्या किमतीचा फायदा घेण्यासाठी मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक विकून नफा मिळवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला असून दोन्ही धातूंची चमक सध्या काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Share This Article