जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार

PCB Admin
1 Min Read

दि.१२(पीसीबी)-जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवानं या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत. ही घटना जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरात घडली. फारूक अब्दुल्ला त्यांच्या परिचयाच्या एका वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी तिथं गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडलं आहे. कमल सिंह जमवाल असं त्याचं नाव असून पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी झुडपांमध्ये लपून बसला होता, मात्र सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे

Share This Article