कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आणि पत्रकारिता विषयावर पत्रकारांसाठी व्याख्यान

1 Min Read

प्रसार माध्यम क्षेत्रात वेगाने वाढत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील कार्यपद्धती अधिक सक्षम, अचूक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे आयोजित या व्याख्यानामध्ये “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृत्तसंकलन, बातमी लेखन, संपादन छायाचित्र संपादन तसेच माहिती विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि प्रभावी पद्धतीने कशी पार पाडता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Share This Article