रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात कोप्रोली गावालगत भूकंपाचा सौम्य धक्का

1 Min Read

दि.१६(पीसीबी)-रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात कोप्रोली गावालगत बुधवारी संध्याकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. संध्याकाळी 5.47 वाजण्याच्या सुमारास उरण ते चिरनेर मार्गावर हा धक्का जाणवला.भूकंप मापन संकेतस्थळांवरील प्राथमिक नोंदीनुसार, धक्क्याचे केंद्र कोप्रोली गावाजवळ असल्याचे निर्देशित झाले असून तीव्रता 2.5 मॅग्निट्यूड इतकी होती. हा धक्का जमिनीपासून सुमारे 5 किलोमीटर भूगर्भात निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून असून उरण तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती घेतली जात आहे. अद्याप कोणतीही दुर्घटना किंवा नुकसान झाल्याची नोंद नाही.

“धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा होता. परिसरात कोणतेही नुकसान झालेले नाही,” अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी स्पष्ट केले.

Share This Article