इंद्रा पार्क सोसायटी गणेशोत्सवात भव्य रंगभरण स्पर्धा;७ दिवस भरगच्च कार्यक्रम*

1 Min Read

चिंचवड दि.३१ – शहरातील किवळे भागातील इंद्रा पार्क सहकारी गृहरचना संस्थेत गणेश चतुर्थीला श्रीगणेश मूर्तीची जल्लोष व मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.

दरवर्षी इंद्रा पार्क सोसायटी सभासदांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते याही वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सभासदांच्या मुलांसाठी रविवार दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भव्य रंगभरण स्पर्धा तर शनिवारी रात्री ७ ते १० दरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांनी अतिशय उत्साहात स्पर्धा गाजवली. लहान मुलांसोबत च सभासदांसाठी देखील अनेक विध उपक्रमाचे आयोजन या आयोजनात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे कमिटीने सांगितले. ७ ही दिवस सोसायटी सभासद नियोजनपूर्वक महाआरती, महाप्रसादाचे यशस्वी आयोजन करीत असून यामध्ये सोसायटी मधील कुटुंबातील जेष्ठ नागरिक, महिला, तरुण उत्साहात सहभागी होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. इंद्रा पार्कच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक देखील दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नियोजित असून या साठी सर्व नियुक्त कमिटी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमात सर्वच सभासद मोठ्या उत्साहात सहभागी होऊन सण उत्सवाचा आनंद घेत आहेत.

Share This Article