नितेश राणे यांनी तंबी ?

bpcauthor bpcauthor
1 Min Read

नागपूर दि. १८ (पीसीबी) – नागपूर येथे घडलेली घटना लक्षात घेता एकंदरीत ही घटना सुनियोजित कट असल्याचे पुढे येत आहे. काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणे हे कुठल्या संविधानात लिहिलंय? असा सवाल करत मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे आता प्रश्न उद्भवला आहे की, मुळात ट्राली भरून दगडी आल्या कुठून? त्यामुळे आता पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कशी कारवाई होते ते बघाच, असेही नितेश राणे म्हणाले.

येत्या गुरुवारी मी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच या कार्यक्रमाचे पाहिलं आमंत्रण मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देईल. मत्स्य खात्याचा मंत्री असल्याने माझी निमंत्रण पत्रिका देखील माशाच्या आकाराची आहे. माझ्या राजीनामे यांची मागणी कोणीही केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्या मधला मी एक आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे त्यामध्ये नितेश राणेंचं नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही. अशी स्पष्टोक्ती ही मंत्री नितेश राणे यांनी दिली. हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि आक्रमक नेता होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावरील चर्चेवर आता स्वत: नितेश राणे स्पष्टीकरण दिले आहे.

Share This Article