क्रिकेटचे तिकीट ब्लॅक केल्या प्रकरणी तिघांना अटक

PCB Admin
1 Min Read

देहूरोड, दि. २
क्रिकेटचे तिकीट ब्लॅक केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मामुर्डी येथे करण्यात आली.

अर्जुन शशिकांत सप्पागुरु (वय २२, रा. देहूरोड), रवींद्र मनोहर बनसोडे (वय २७, रा. मामुर्डी, पुणे. मूळ रा. धाराशिव), राहुल राजू कानडे (वय २४, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील शिरसाट यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट सामना गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला. या मॅचसाठी एका प्रकारातील दोन हजार ६४७ रुपये तिकीट होते. या दराची तिकिटे आरोपींनी खरेदी केली. तीच तिकिटे त्यांनी ब्लॅकने सहा हजार रुपयांना विकली. याबाबत पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली असता पोलिसांनी तिघांना अटक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article