वाकडच्या पृथ्वीराज विनोदे याच्याकडून

PCB Admin
2 Min Read

कांस्य पदकाची कमाई

खेलो इंडीया विंटर स्केटिंग गेममध्ये केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

पिंपरी, दि. २७ : वाकड येथील कु.पृथ्वीराज प्रशांत विनोदे याने लेह लडाख येथे संपन्न झालेल्या खेलो इंडीया विंटर गेम २०२५ मध्ये ५०० मिटर आईस स्टेटींग लॅाग ट्रॅक प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाची कमाई करत पिंपरी चिंचवडचे नाव लौकिक मिळवले आहे. या यशाबद्दल वाकडसह पिंपरी चिंचवड शहरातून पृथ्वीराजचे अभिनंदन होत आहे.

पृथ्वीराज यंगस्टर स्पोर्ट क्लब तापकीर बंधु सुमित तापकीर, सुयोग तापकीर व संजोग यांच्याकडे रोलर स्केटिंगचा सराव करतो. आईस स्केटींगचा सराव राष्ट्रीय खेळाडु सुमित तापकीर व सुयोग तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ४ ते ५ वर्षांपासून करत आहे. खेलो इंडीया स्पर्धेसाठी पृथ्वीराजने युरोपमध्ये जाऊन तसेच दिल्ली व मुंबई येथील प्रशिक्षण कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय खेळाडु सुमित तापकीरने पृथ्वीच्या सरावा बाबतीत विशेष कष्ट घेतले, त्याचे फलित म्हणजे हे पदक आहे. पृथ्वी इंदीरा कॅालेज ऑफ कॅामर्स व सायन्स येथे बि.बि.ए प्रथम वर्ष शिक्षण घेत आहे. पुढे जाऊन देशाचे प्रतिनिधित्व करुन आईस स्केटींग प्रकारात देशाचे नाव उंचावण्याचे पृथ्वीराजचे स्वप्न आहे.

प्रशांत विनोदे यांना ट्रेकिंग, रनिंग आणि व्यायामाची प्रचंड आवड आहे. राज्यच नव्हे तर देशाबाहेर देखील त्यांनी आजवर गडकिल्ले भटकंती व ट्रेक केले आहेत. त्यामुळे पृथ्वीराजला लहानपणापासूनच वडील प्रशांत विनोदे यांच्याकडून खेळाचे धडे मिळाले आहेत.अभ्यासासोबत स्टेटींगची आवड जोपासत देशासाठी खेळण्याचे स्वप्न पृथ्वीराजने पहिले आहे. आणि त्यादृष्टीने त्याने पाऊले देखील टाकली आहेत. आज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत त्याने स्वताचे, वडिलाचे आणि पिंपरी चिंचवडचा नावलौकिक वाढविला आहे.

Share This Article