मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार

1 Min Read

सांगवी, दि. 26 (पीसीबी) : मित्राला मारहाण केल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार केले. ही घटना रविवारी (दि. 24) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास क्रांती चौक नवी सांगवी येथे घडली.

यशराज (पूर्ण नाव माहिती नाही) असे जखमी तरुणाचे नाव आहे. यशराज याच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईश्वर शिंदे आणि एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी यशराज याच्या मित्राला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आरोपींनी यशराज आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ व दमदाटी करून हाताने मारहाण केली. ईश्वर शिंदे याने यशराजवर चाकूने वार करत त्यास गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article