सुदूंबरे गावात दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

1 Min Read

तळेगाव, दि. 12 (पीसीबी) – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदूंबरे गावात सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखेने छापा मारला. यामध्ये एक लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) सायंकाळी 5:15 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस अंमलदार धनंजय भोसले यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार तीस वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सुतुंबरे गावात दारूभट्ट सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. या कारवाई मध्ये एक लाख 12 हजार रुपये किमतीचे 2200 लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article