टेम्पोच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) :

पादचाऱ्याला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना वाकड येथील शनी मंदिरासमोर घडली.

याप्रकरणी सीताराम बच्चालाल गुप्ता (रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश अरुण जाधव या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेले असताना शाळेसमोरील रस्ता पायी ओलांडत होते. दरम्यान, भरधाव आलेल्या टेम्पोने फिर्यादी यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article