पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी,  दि. 15 (पीसीबी)

भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 13) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नांदे म्हाळुंगे रोडवर घडला.

आशिष प्रेमनाथ भाटिया (वय 53, रा. निगडी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप (आरजे 41/जीए 5794) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील पिकप भरधाव वेगात चालवून फिर्यादी आशिष भाटिया यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये आशिष भाटिया यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर पिकअप चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article