किरकोळ कारणावरून एकाच बेदम मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

महाळुंगे, दि. ०२ (पीसीबी) : किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील येलवाडी येथे घडली.

गणेश परशुराम राठोड (वय 35, रा. तळेगाव दाभाडे, ता मावळ) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भास्कर गडलर (रा. चिखली) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची गाडी घेऊन चाकण-तळेगाव रोडने तळेगाव येथे जात होते.असताना येलवाडी गावच्या हद्दीमध्ये आरोपी एका गाडीतून आले. त्यांनी फिर्यादी यांची गाडी थांबवून त्यांना तू माझ्याबद्दल लोकांना काय सांगतो असे म्हणून शिवीगाळ करत त्याला थांबू यांनी मारहाण केली. तसेच काठीने डाव्या पायावर मारून त्यांना जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article