तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

रावेत, दि. 15 (प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला पिस्तूलसह अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 13) रात्री जाधववस्ती, रावेत येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाळा राजू जाधव (वय 27, रा. जाधववस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिरुद्ध जाधव याला 1 सप्टेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रावेत पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article