गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिखली, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – आमच्या एरियात वर्गणी का गोळा करता म्हणत तरुणाला कोयत्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.28) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रोड, चिखली येथे घडली आहे.

महेश प्रदीप गुणेवाड (वय .21 रा चिखली) याप्रकरणी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्वल रोकडे, मानव रोकडे, ओम नरवडे, यश नरवडे (सर्व रा. रोकडे वस्ती, चिखली) व त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश हे रिक्षा चालक आहेत. ते बुधवारी त्यांच्या साथीदारासोबत रोकडे वस्ती परिसरात गणपती उत्सवाची वर्गणी गोळा करत होते. यावेळी आरोपी कोयते, काठ्या, हॉकी स्टिक व लोखंडी रॉड हातामध्ये घेऊन आले. आरोपींना पाहून परिसरातील दुकानदारांनी भीतीने त्यांची दुकाने बंद केली.

परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. महेश हे सोन्या तापकीर याची रिक्षा चालवत आहेत याचा आरोपींना राग होता. त्यासह आरोपींनी ‘आमच्या परिसरात वर्गणी का गोळा करता’ म्हणत महेश यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी महेश यांच्या खिशामध्ये असलेले वर्गणीचे रोख 13 हजार रुपये व स्वतःचे चार हजार रुपये असे एकूण 17 हजार रुपये हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article