ट्रेडिंगच्या बहाण्याने 12 लाख 77 हजारांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) हिंजवडी,
ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 जुलै ते 28 मे या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 31647173331 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुस्र, आरोपींनी 31647173331 या क्रमांकावरून व्हाटसअप ग्रुप तयार केला. त्यात फिर्यादी यांच्या नंबरला जॉईन करून घेतले. ग्रुप मध्ये फिर्यादी यांना ट्रेडिंगचे आमिष दाखवले. त्यातून चांगला नफा होत असल्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी 12 लाख 77 हजार रुपये गुंतवणूक केले असता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article