शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बनावट कागदपत्रे शासनाकडे सादर; प्रशिक्षकावर गुन्हा दाखल

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – एका प्रशिक्षकाने त्याच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडूंनाशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे शासनाला सादर केली. याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20219-20, 2020-21 आणि 2021-22 या कालावधीत प्रभात रोड, एरंडवणे, पुणे येथे घडली.गणेश पोपट पाटील (वय 45, रा. एरंडवणे, पुणे) यांनी बुधवारी (दि. 7) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशुतोष मुरलीधर जगताप (पूर्ण पत्ता माहिती नाही. रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगताप याने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी त्यांच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडू यांचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. त्याकरिता आरोपी जगताप याने फिर्यादी यांच्या मुलाच्या नावाचा 100 रुपये दराचा स्टॅम्प पेपर घेऊन त्यावर बनावट प्रमाणपत्र तयार केले. ती कागदपत्रे शासनाला सादर करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article