दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणी जखमी

1 Min Read

हिंजवडी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – पायी रस्ता ओलांडत असलेल्या तरुणीला एका दुचाकीने जोरात धडक दिली. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि. 7) सकाळी साडे नऊ वाजता कस्तुरी चौक, वाकड येथे घडला.

महेक शेख (रा. चिंचवड) असे जखमी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी महेक यांच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोपाल चौधरी (वय 20, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी ऑफिसला जात असताना वाकड मधील कस्तुरी चौकात ती पायी चालत जात होती. कस्तुरी चौकात आल्यानंतर रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने महेक यांना धडक दिली. त्यात महेक जखमी झाल्या. तसेच दुचाकीस्वार गोपाल चौधरी देखील किरकोळ जखमी झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article