ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

PCB Admin
1 Min Read

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) भोसरी,
भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 30) सायंकाळी साडेसात वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडला.

संपत त्रिंबक शिरसाठ (वय 46, रा. मोशी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच 46/व्हीटी 4869) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरसाठ हे त्यांच्या दुचाकीवरून मोशी येथून भोसरीकडे जात होते. ते गोडाऊन चौक येथे आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामध्ये शिरसाठ हे गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article