बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि ४ जुलै (पीसीबी ) – बस प्रवासात वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी साडेबारा ते पावणे दोन वाजताच्या कालावधीत आळंदी ते भूमकर चौक वाकड दरम्यान घडली.

याप्रकरणी सिंहगड रोड पुणे येथील 66 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी दुपारी आळंदी ते भूमकर चौक वाकड दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील 80 हजार रुपये किमतीची 22.50 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article