सोने खरेदीमध्ये भोसरीचे विलास भांबुर्डेकर यांची 1 कोटी 87 लाखांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

सोने खरेदीमध्ये सोनाराची तब्ब्ल 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक 27 ऑक्टोबर 2023 ते 30 मार्च 2024 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली आहे.

याप्रकरणी गुरुवारी (दि.30) विलास महादेव भांबुर्डेकर (वय 60 रा.भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी भावेश संपतराज जैन (वय 43 रा.मुंबई) व जिग्नेश प्रितम जैन (वय 52 रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरीतील भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलेर्स यांनी बीएसजे बुलीयन मेटल हब एलएलपी कंपनी यांच्याकडून वेळोवेळी सोने खरेदी केले. यासाठी कंपनीच्या खात्यावर 1 कोटी 16 लाख 44 हजार 150 एकदा व 58 लाख 22 हजार 75 रुपये दुसऱ्यांचा असे 1 कोटी 87 लाख 66 हजार 97 रुपये पाठवले.
मात्र आरोपींनी फिर्यादींना सोने पाठवले नाही.याबाबत विचारणा केली असता बील चुकले आहे दुरुस्त करून सोने पाठवता, आता आम्ही गोल्ड एक्झीबीशनमध्ये आहोत म्हणत सोने व पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे म्हणून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article