तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट तीनने खेड तालुक्यातील शेळ पिंपळगाव येथून अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी चार वाजता करण्यात आली.

नितीन उर्फ काळू रामदास कराळे (वय 28, रा. शेळपिंपळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामदास मेरगळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी नितीन कराळे याला पुणे जिल्ह्यातून दोन वार्हांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता खेड तालुक्यातील शेळपिंपळगाव येथे आला. त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 300 रुपये किमतीची एक तलवार जप्त करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article