पुणे नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

कुरुळी, दि. १४ (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. १३) पाहते पाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडला.

मयत तरुणाची ओळख पटली नाही. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक परमेश्वर खाडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे एका अज्ञात वाहनाने एका तरुणाला जोरात धडक दिली. त्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article