पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

PCB Admin
1 Min Read

देहूरोड, दि. १४ (पीसीबी) : पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १२) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास शीतळानगर, देहूरोड येथे करण्यात आली.

संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन शेजाळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतळानगर येथील बस थांब्यावर एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन संगम क्षीरसागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजारांचे एक पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article