बेकायदेशीररित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – बेकायदेशीररित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.30) किवळे येथे करण्यात आली.

याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई स्वप्नील चंद्रकांत साबळे यांनी फिर्याद दिली आहे,. यावरून कय्युम आबिदअली चौधरी (वय 37 रा.रावेत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय बेकायदेशीर रित्या कोणत्याही सुरक्षितते शिवाय गॅस रिफील करत होता. इतरांच्या जिवाला धोका असल्याची माहिती असताना देखील आरोपी हा धाकायक पद्धतीने गॅसरिफील करत होता. यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून 12 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. देहुरोड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Share This Article