कामगाराने चोरली पेट्रोल पंपावरून 83 हजार रुपयांची रक्कम

bpcauthor bpcauthor
1 Min Read

आकुर्डी, दि. ३१ (पीसीबी) – पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारानेच चौरली 83 हजार रुपयांची रक्कम चोरली आहे. ही घटना सोमवारी (दि. 29) आकुर्डी येथील मोरया पेट्रोलपंपावर घडली.

याप्रकरणी अमेय शिरीश मालपाठक (वय 38 तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दिगंबर बापू भागडे (वय 30 रा.अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या पेट्रोलपंपावर कामगार म्हणून काम करत होता. यावेळी आरोपीने पंपावरील पेट्रोल विक्री ची 83 हजार 500 रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share This Article