चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोराला अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी, दि. ३१ (पीसीबी) – चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा एक साथीदार मात्र फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) हिंजवडी येथील वाडकर वस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी राजेशसिंग जगदिशसिंग तोमर (वय 32 रा. डांगे चौक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे, यावरून पोलिसांनी राजू दिवानसिंग बिस्ट (वय 35 रा. डांगे चौक) याला अटक केली असून त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे उघड्यावर 30 हजार रुपयाचे साहित्य पडले होते. यात एकूण नऊ अल्युमिनियमच्या प्लेट होत्या. आरोपी ते चोरण्याचा प्रयत्न करत होते. त्या आधीच त्यांना पोलिसांनी अटक केले आहे. याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Share This Article