कंपनीच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

PCB Admin
1 Min Read

चाकण, दि. २ (पीसीबी) – कंपनीच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 फ़ेब्रुवारी 2016 ते 26 जुलै 2023 या कालावधीत एस के एस फासनर्स प्रा ली आंबेठाण रोड, चाकण येथे घडला.

अजितकुमार बिपेन बिहारी त्रिपाठी (रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचा-याचे नाव आहे. याप्रकरणी मुनिष कुंदनलाल राठी (वय 41, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजितकुमार हा फिर्यादी यांच्या कंपनीत सेल्स आणि डेव्हलपमेंट विभागात डेप्युटी मॅनेजर पदावर काम करत होता. कंपनीने दिलेल्या मेल आयडी वरून त्याने कंपनीची गोपनीय माहिती स्वतःच्या मेलआयडीवर घेतली. त्यानंतर कंपनीच्या अपरोक्ष कंपनीतून काम सोडून गेल्यानंतर त्या माहितीचा गैरवापर करून कंपनीच्या ग्राहकांना कमी दराने प्रोडक्ट देतो, असे सांगून कंपनीचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article